Psalms 51

मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र; जेव्हा तो बथशेबापाशी गेल्यानंतर नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आला तेव्हाचे.

1हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर,
तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझे अपराधाचा डाग पुसून टाक.
2देवा माझे अपराध धुऊन टाक,
आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.

3कारण माझे अपराध मला माहित आहेत.

आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर असतात.
4तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे,
आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.
जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो.
तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.

5पाहा! मी जन्मापासूनच:च पापी आहे

आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
6पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो,
तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे.

7मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर,

मी शुद्ध होईल, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईल.
8आनंद व हर्ष मला ऐकू दे,
म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
9माझ्या पापांकडे बघू नकोस,
माझ्या सर्व अपराधाचा डाग पुसून टाक.

10देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर.

आणि माझ्या आत स्थीर आत्मा नवा कर.
11तुझ्या उपस्थितितून मला दूर लोटू नकोस
आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.

12तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे,

आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.
13तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविण
आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.

14हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर,

आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन.
15प्रभू, माझे ओठ उघड
आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल.
16कारण यज्ञाची आवड तुला नाही,
नाहीतर मी ते दिले असते,
होमार्पणाने तुला संतोष होत नाही.

17देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय,

तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाही.
18हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर.
आणि यरुशलेमेच्या भींती पुन्हा बांध.
तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील.
तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील.
19

Copyright information for MarULB